Thursday, April 23, 2015

घावन-cum-उत्तपा


सौ. लोचना भानुशे
माझ्या आईने मागील ४५ वर्षात जे जे पदार्थ करून शेकडो लोकांना खाऊ घातले त्यातील काही इथे देत आहे.


साहित्य: २ वाटी उकडा तांदूळ, १ वाटी इडली रवा, दीड वाटी उडीद डाळ, २ वाटी बारीक खिसलेला कांदा, १ वाटी खिसलेला नारळ, कोथिंबीर, मिर्ची, मीठ, २ ग्लास पाणी, १ छोटी वाटी तेल
कृती: तांदूळ, रवा व उडीद डाळ एकत्र करून त्याचे पीठ करावे. तयार पीठामध्ये कांदा, नारळ, मिर्ची, कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालावे. मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून ते घोटावे. थोडा वेळ ठेवावे. मग गरम तव्यावर हे मिश्रण उत्तपासारखे घालावे, थोडं तेल सोडावे. दोन्ही बाजूने झाल्यावर टोमॅटो सॉस किंवा कच्च्या कैरीच्या लोणच्या बरोबर खावे.


2 comments:

  1. अहाहा, मस्तच. आता मी घरी हे करून पाहणार आणि फोटो पण टाकेन.
    मंदारजी ब्लॉग लिहीण्यास सुरू केल्याबद्धल अभिनंदन. मराठी ब्लॉगर कम्युनीटीमधे स्वागत.

    ReplyDelete