Thursday, April 23, 2015

बीटाचा हलवा

साहित्य: ४ मध्यम आकाराचे बीट, १/२ वाटी साखर, पाव लिटर दूध, सुकामेवा आवडीप्रमाणे, वेलची व जायफ़ळ पावडर.
कृती: बीट बारीक खिसून घ्यावे. गॅसवर दूध गरम करावे व त्यात खिसलेला बीट घालावा. हलक्या आचेवर दूध आटेपर्यंत शिजवावे. नंतर त्यात साखर, चिमूटभर जायफ़ळ, पाव चमचा वेलची पूड घालावे. तयार बीटाच्या हलव्यावर सुकामेवा आवडीप्रमाणे घालावा. गरमागरम बीटरूट हलवा खाण्यास तयार. फ़्रिजमध्ये थंड करूनही खाता येतो.

3 comments:

  1. मस्तच दिसतोय. चव देखील छानच असेल. खवा घातल्यास अजुन वेगळी छान चव लागेल.

    ReplyDelete
  2. थोडा खवा, किंवा दूधाची पावडर घालायला हरकत नाही. चव ही छान लागेल व लवकर होईल.

    ReplyDelete
  3. थोडा खवा, किंवा दूधाची पावडर घालायला हरकत नाही. चव ही छान लागेल व लवकर होईल.

    ReplyDelete